BJP Mira Bhayandar

Highlights from the 46th BJP Foundation Day Celebration

भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या स्थापना दिनानिमित्त भाजपा शहर जिल्हा कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत हा विशेष दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत सेवा, सुशासन आणि संघटनशक्तीच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी अधिक दृढ करण्यात आला. भाजपा ही केवळ राजकीय संघटना नसून, राष्ट्रनिर्माणाच्या ध्येयाने प्रेरित असलेले कार्यकर्त्यांचे सशक्त संघटन आहे. पक्षाच्या विचारधारेवर निष्ठा ठेवत समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी आणि ‘विकसित भारत’ाच्या संकल्पपूर्तीसाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धार या स्थापना दिनानिमित्त करण्यात आला. राष्ट्र प्रथम, संघटन सर्वोपरि आणि जनसेवा हेच ध्येय!

Scroll to Top
×

Congratulations! You are registered.