BJP Mira Bhayandar

Constitution Day Programme Held at BJP District Office, Mira-Bhayandar

भारतीय जनता पार्टी, मिरा-भाईंदर जिल्हा कार्यालय येथे संविधान दिनानिमित्त प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी भारतीय संविधानात अधोरेखित करण्यात आलेल्या समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या मूल्यांना अभिवादन करत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीतील अमूल्य योगदानाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले.

संविधानातील मूल्यांचे जतन व संवर्धन करण्यासोबतच लोकशाही मूल्यांना अधिक बळकटी देत संविधानाचा गौरवशाली वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. राष्ट्रहित आणि संविधानाच्या रक्षणासाठी एकजुटीने व सामूहिक जबाबदारीच्या भावनेने कार्यरत राहण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

Scroll to Top
×

Congratulations! You are registered.