आज भाजपा जिल्हा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी भारताच्या तिरंग्याला अभिवादन करताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे तसेच देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले.
स्वातंत्र्याने आपल्याला अधिकार दिले असून त्यासोबतच राष्ट्राप्रती आपली जबाबदारीही अधोरेखित केली आहे. राष्ट्रहित, एकता, प्रामाणिकपणा आणि विकास या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून सक्षम, समृद्ध आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी कार्यरत राहण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
स्वातंत्र्य दिनाच्या सर्व देशवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#MiraBhayandar #IndependenceDay #JaiHind #BJP #RashtraPratham
